ओम नमस्ते गणपतये...अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला जठारपेठ परिसर:सिद्धिविनायक मंदिरात 3 हजार विद्यार्थी उपस्थित
2 hours ago
2
ॐ नमस्ते गणपते...त्वमेय प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि....अशा शब्दात तीन हजारांवर शालेय विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष गावून गणेशाचा एकच जयघोष केला. अथर्वशीर्षाच्या जयघोषाने जठारपेठेतील सिद्धिविनायक गणेश मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. श्री गणेश जयंतीच्या पवित्र निमित्ताने जठारपेठ ज्योती नगरातील सिद्धिविनायक मंदिरात एक लाखवेळा सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प, नीलेश देव मित्र मंडळ, भारत शिक्षण प्रसारक मंडळ व सिद्धिविनायक गणेश मंदिरातर्फे १ फेब्रुवारी सकाळी आयोजन केले होते. या वेळी भारत विद्यालय, विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यासह एकवीरा विशेष बालविकास संस्थेचे कर्ण व मूकबधिर विद्यार्थीही सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या आवाजातील गणपती अथर्वशीर्ष वदनाने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. गणपतीचा जयघोष होत असल्याने, भाविकही भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिराचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष प्रभाकर दोड गुरूजी, सचिव निनाद आठवले, भारत शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष अनिल पिंपरकर, निशिकांत पुजारी, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय घोगरे, विवेकानंद इंग्रजी स्कूल उपमुख्याध्यापिका मीनल कापसे, डॉ. पल्लवी दिवेकर आदींचा सत्कार केला. त्यानंतर अथर्वशीर्ष पठणाला सुरूवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पिंपरकर यांनी केले. सूत्रसंचालन अमरजा ढोमे यांनी केले तर रश्मी देव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला नीलेश देव, जयंत सरदेशपांडे, संजय रुहाटिया, अविनाश देव, मोहन गद्रे, प्रा. नरेंद्र देशपांडे, संजय काळे, डॉ. विनायक देशमुख, कुशन सेनाड, डॉ. पनपालिया, दिलीप देशपांडे, दीपक देशपांडे, उदय महा, राजेश शर्मा, दीपक शुक्ला, सुधीर सोमण, नरेश बियाणी, विनोद देव, ॲड. शिरीर देशपांडे यांच्यासह प्रल्हाद महाराज उपासना मंडळ, गोंदवलेकर महाराज उपासना मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. स्नेहा गोखले, अवंतिका मैराळ, मंजूषा घोटीकर, मेघा देशमुख, सीमा सरदेशपांडे, प्रणाली शास्ती, शिल्पा दलाल, सीमा फडणीस, स्वाती देवधर, रुपाली चोपडे, सोनाली वरसारे, संजय भालेराव, अग्निहोत्री, राजेंद्र गुणल्लवार, प्रकाश जोशी, राजु कनोजिया, अजय शास्त्री, रामहरी डांगे, रवींद्र मेश्राम, विजय वाघ, नरेंद्र परदेशी, सोनु मोठे, मनीष अभ्यंकर, सुनिल देशपांडे, डॉ. मोहन, काजळे, शैलेश देव, गणेश मैराळ आशु यादव, नीलेश दुधलम आदी उपस्थित होते.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)