अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. Pudhari Photo
Published on
:
23 Jan 2025, 8:51 am
Updated on
:
23 Jan 2025, 8:51 am
आष्टी, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या (Ambhora Police) हद्दीतील सर्व नागरिकांना सुचीत करण्यात येते की, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब हानपुडे- पाटील यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. (Beed Crime News)
त्याचाच एक भाग म्हणून बीड पोलिसांमार्फत नागरिकांना लवकरात लवकर चांगली सेवा देऊन त्यांचे जीवन सुरक्षित करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून अंभोरा पोलीस दल जास्तीत जास्त लोकांभिमुख करण्यासाठी मी अंभोरा पोलीस स्टेशनच्या वतीने आपणाला आवाहन करतो की, आपण अंभोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले असता तेथे आपल्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली जात नसेल. अथवा तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याकडे कोणत्याही स्वरूपात लाच मागितली असेल. तर तत्काळ माझ्या कार्यालयात येऊन संपर्क साधावा अथवा माझ्या मोबाईल क्रमांकावर आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने मेसेज करावा.
तसेच अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत कोठेही कोणताही अवैध धंदा चालत असेल. तर त्याबाबत तत्काळ माझ्याशी संपर्क साधून मला माहिती कळवावी. अवैध धंद्याचे हद्दीतून समूळ उच्चाटन करण्यासाठी आपल्या सहकार्याची खुप गरज आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास आपण निश्चितच आपल्या हद्दीतील सर्व अवैध धंदे पूर्णतः बंद करू शकतो. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.