छत्रपती संभाजीनगरमध्ये दांडिया फिव्हर:नवरात्रीच्या रंगात रंगली तरुणाई; गरबाच्या तालावर ठेका, पाहा जल्लोषाचा VIDEO

2 hours ago 1
नवरात्र सणामुळे सगळीकडेच प्रसन्नतेचे वातावरण पसरले आहे. दांडियाचा जल्लोष ते गरब्याची धमाल आणि सोबत नवरंगांची ओढ असा हा नवरात्र सण सध्या देशभर साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही नवरात्रीचा उत्साह हा शिगेला पोहोचला आहे. वंदे मातरम, साई प्रतिष्ठान, राधाकृष्ण, स्वाभिमानी, जय संतोषी माता नवरात्र समिती या विविध ठिकाणी दिव्य मराठी डिजिटलने भेट दिली. त्यावेळी याठिकाणी नवरात्रीचा वाढलेला फिव्हर दिसून आला. दांडियासाठी तरूणाईमध्ये गुजराथी वेशभूषेचे आकर्षण असल्याने विविध ठिकाणच्या गरबा दांडियामध्ये गुजराथी वेशभूषा आणि गुजराथी संगीताची धूम दिसत आहे. तसेच हिंदी व मराठी चित्रपट गीतांसह मराठी लोकगीतांच्या तालावर दांडिया खेळण्यात तरूणाई दंग झाली आहे. संभाजीनगरमध्ये विविध ठिकाणी दांडिया आणि गरबा नृत्याच्या उत्साहाला उधाण आलेले पाहायला मिळाले. या सर्व मंडळांमध्ये महिला सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आल्याचे दिसून आले. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली असून 12 ऑक्टोबरला सांगता होणार आहे. मनोभावे देवी मातेची पूजा, आराधना आणि साधना करण्यासोबत नऊ दिवस रास गरबा आणि दांडिया तितक्याच जल्लोषात खेळताना तरूणाई दिसत आहे. नवरात्रोत्सव काळात सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे गरबा आणि दांडिया. घागरा, चोळी आणि पारंपरिक दागिने परिधान करून अतिशय जल्लोषात आणि ऊर्जेने हे नृत्यप्रकार केले जातात. गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची निर्मिती गुजरातमध्ये झाली आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीत गरबा किंवा दांडिया खेळण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे नऊ दिवस दररोज सायंकाळी मातेची पूजा केल्यानंतर तेथे उपस्थित भाविक दुर्गादेवीच्या मूर्तीसमोर दांडिया खेळतात. गुजरातसह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गरबा आणि दांडियाचा आवाज ऐकू येतो. यानिमित्ताने मित्र, कुटुंब किंवा नव्या लोकांसह नाचण्याचा आनंद घेता येतो. नवरात्रीच्या काळात भक्त गरबा आणि दांडिया करून देवीला प्रसन्न करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात. काय आहे नवरात्रीची कथा? असे मानले जाते की वर्षापूर्वी, महिषासुर या राक्षसाच्या दहशतीमुळे गुजरातमधील लोक खूप त्रस्त झाले होते, त्यानंतर लोकांच्या समस्या पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी देवी मातेला मदतीसाठी आवाहन केले. देवांच्या कोपामुळे देवी जगदंबेने प्रकट होऊन राक्षसाचा वध केला. त्यानंतर दरवर्षी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला आणि लोक उत्सव म्हणून नऊ दिवस उपवास करतात आणि देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी गरबा आणि दांडिया खेळतात. 2015 पासून आम्ही रास दांडियाचे आयोजन घरातील अंगण आणि चौकातून गरबारस्त्यावर आला आणि तीच गरब्याच्या प्रसाराची पहिली पायरी ठरली. वंदे मातरम रास दांडियाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप थोरात आपल्या दांडिया उत्सवाबद्दल म्हणाले, 2015 पासून आम्ही रास दांडियाचे आयोजन करतो. उल्का नगरीच्या मैदानावर महिला सुरक्षितपणे खेळतात आणि गरब्याचा आनंद घेतात. महिलांसाठी वेगळी, पुरुषांसाठी वेगळी व कपल्ससाठी वेगळी व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे. आम्ही पूर्णपणे मोफत प्रवेश देतो. दुपारी 12 ते 4 यावेळेत आम्ही आधार कार्ड तपासून मोफत पासेस देतो. 40 महिला स्वंयसेवक जय संतोषी माता नवरात्र समितीच्या अध्यक्षा तृप्ती प्रकाश सानप म्हणाल्या, जय संतोषी माता नवरात्र उत्सवाला 10 वर्ष पूर्ण झालेत. संतोषीमाता नगरचे माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप यांनी या भागातल्या महिलांसाठी मोफत ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी याठिकाणी 40 महिला स्वंयसेवकांची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article