Published on
:
06 Feb 2025, 8:00 am
Updated on
:
06 Feb 2025, 8:00 am
जळगाव | घरफोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आठ घरफोड्या केल्याचे उघड झाले असून 6 संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. त्यांच्याकडून दहा तोळे सोने, 650 ग्रॅम चांदी, एक एलईडी टीव्ही असा एकूण 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत होणाऱ्या घरफोड्या बाबत विशेष मोहीम राबविणे बाबत पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी, यांनी दिलेल्या सुचनेवरुन अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व पोलीस उप अधिक्षक, जळगाव उपविभाग संदिप गावीत यांचे मार्गदर्शनानुसार रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दितील महाबळ परिसरात झालेल्या घरफोड्या हया सागर शिवराम डोईफोडे व त्यांच्या साथीदारांनी केल्याची गुप्त बातमी मिळाल्याने संशयित सागर शिवराम डोईफोड यास ताब्यात घेऊन सखोल विचारपुस केली असता, त्याने रामानंद नगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या 6 घरफोड्या उघड झाल्या. या घरफोड्या 06 गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्दे मालापैकी एकुण 10 तोळे सोने व 650 ग्रॅम चांदी तपासात हस्तगत करण्यात आली आहे.
तसेच संशयित आरोपी नितेश मिलींद जाधव, दिपक विनोंद आढाळे, रवि भागवत सोनवणे ,अनिल ऊर्फ मारी भगवान सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशन येथील एका गुन्ह्यातील LED TV व इतर मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व पोलीस उप अधिक्षक जळगाव उपविभाग . संदिप गावीत सो यांचे मार्गदर्शनानुसार प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे सहाय्याने संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, इरफान मलिक, हेमंत कळसकर, रेवानंद साळुखे, /विनोंद सुर्यवंशी, /रविंद्र चौधरी, /उमेश पवार यांनी कारवाई केली असून आरोपी कडून एकुण 8 लाख रुपये किमतीचे सोने, 60 हजार रूपये किमतीची चांदी तसेच एकुण 10,000/- रु किमतीची LED TV व इतर मुददेमाल हस्तगत केला आहे.