दिव्य मराठी अपडेट्स:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड ‎जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड गावामध्ये आज सभा‎

6 days ago 2
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नांदेड ‎जिल्ह्यातील बारड गावामध्ये आज सभा‎ नांदेड - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज १५ रोजी‎‎ नांदेडला सभा होणार आहे. ‎‎महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ‎‎ मुदखेड तालुक्यातील बारड येथे‎‎त्यांची सभा आयोजित केली आहे.‎‎सकाळी ११ वाजता ते सभेत संवाद‎‎साधतील. यावेळी खासदार अशोक‎चव्हाण, अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, माजी‎आमदार अमिता चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष अॅड.‎किशोर देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.‎ आ. संतोष बांगर यांच्यावर ‎आचारसंहिता भंगाचा गुन्हा‎ हिंगोली‎ - कळमनुरी विधानसभेचे शिंदेसेनेचे ‎उमेदवार आमदार संतोष बांगर ‎यांच्यावर बुधवार, १३ रोजी रात्री‎ उशिरा कळमनुरी पोलिस ठाण्यात‎ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल‎ झाला. मतदारांना पैसे वाटप करणे‎ तसेच सावरखेडा शिवारात परवानगी ‎न घेता मंडप उभारणी केल्याची ‎तक्रार त्यांच्या विरुद्ध प्राप्त झाली ‎होती.‎ कळमनुरी विधानसभा‎ मतदारसंघात राजकीय वातावरण ‎तापले आहे. पैसे वाटपाच्या‎आरोपावरून तालुक्यातील वाकोडी ‎शिवारात वाहनाची तोडफोड‎ करण्यात आली तसेच महिलांना‎ एकत्र करून पैसे वाटप केले जात‎ असल्याची तक्रार ठाकरे गटाने ‎केली. या प्रकरणात प्रशासनाने दुर्लक्ष‎ केल्याचा आरोप करून ठाकरे गटाचे‎ उमेदवार डॉ. संतोष टारफे, माजी‎ खासदार ॲड. शिवाजी माने,‎जिल्हाप्रमुख अजय पाटील सावंत‎ यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ‎रात्री पोलिस ठाण्यासमोर ठिय्या‎ आंदोलन केले होते. त्यानंतर माजी‎ खासदार ॲड. माने यांच्या‎ तक्रारीवरून संतोष बांगर यांच्यावर‎ गुन्हा दाखल झाला आहे.‎ त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आज बीडच्या‎ खंडोबा दीपमाळेवर होणार दीपोत्सव‎ बीड - संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताच्या बीड‎शाखेच्या वतीने प्रतिवर्षी यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त‎ शहरातील प्राचीन खंडोबा मंदिरातील दोन दीपमाळांवर ‎दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी ‎सायंकाळी ६ वाजता हा दीपोत्सव होणार आहे. या ‎कार्यक्रमासाठी मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्सचे सचिव वाय. जनार्दनराव, संस्कार भारतीच्या देवगिरी प्रांताचे पूर्व‎ अध्यक्ष भरत लोळगे, संस्कार भारतीच्या देवगिरी‎ प्रांताचे प्रसिद्धी प्रमुख महेश वाघमारे यांची प्रमुख ‎उपस्थिती राहणार आहे. दीपोत्सवानंतर शहरातील ‎उदयोन्मुख कलावंतांचे सादरीकरण होणार आहे.‎ शिक्षकांच्या निवडणूक कामामुळे शाळांना १८ ते २० नोव्हेंबर रोजी सुटी देण्यास मंजुरी छत्रपती संभाजीनगर - विधानसभा निवडणुकीमुळे येत्या १८ ते २० नोव्हेंबरदरम्यान शाळांना सुटी जाहीर करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवला होता. त्याला मंजुरी दिली असून या काळात शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा, असे आदेश राज्याचे उपसचिव तुषार महाजन दिले आहेत. त्यासंदर्भातील पत्रही शिक्षण आयुक्तांनाही पाठवण्यात आले आहे. अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र असते अथवा शिक्षकांना मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी अथवा मतमोजणीसाठी प्रतिनियुक्ती केली जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी शिक्षकांच्या निवडणूक कामामुळे शाळा भरवणे शक्य नसेल तिथे मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शासनाने दिले आहेत. उपसचिवांच्या पत्रात तशी सूचना देण्यात आली आहे. दिंडाेरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचे निधन नाशिक - नाशिक दिंडाेरी लोकसभा मतदारसंघाचे दाेन वेळेस खासदार राहिलेले आणि सुरगाणा तालुक्यातील डाेंगररांगातील प्रतापगड ही जन्मभूमी असलेले माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (७५) यांचे गुरुवारी (दि.१४) अल्पशा आजाराने निधन झाले. सरपंच ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. त्यांच्या पार्थिवावर प्रतापगड येथे गुरुवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा समीर, सून, नातवंडे असा परिवार आहे राज्यात रविवारपर्यंत ढगाळ वातावरण, हलका पाऊस नाशिक - राज्यात सध्या गारवा पसरला असून गुरुवारपासून विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात अंशत: ढगाळ वातावरण तयार होत आहे. रविवार, १७ नोव्हेंबरपर्यंत असेच वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण रहाणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांत हे प्रमाण कमी राहणार आहे. जगातील सर्वात छोटी महिला भाजपच्या प्रचारात नागपूर - नागपूरच्या ज्योती किशन आमगे यांची जगातील सर्वात कमी उंचीची महिला अशी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झाली आहे. सोमवारी भाजपतर्फे नागपूर शहरात काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत त्या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. खरगेंच्या प्रचारसभेचामंच वाऱ्याने कोसळला नाशिक - काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभेसाठी त्र्यंबकेश्वर येथे उभारलेला मंच वादळी वाऱ्यामुळे कोसळला. खरगे सभास्थळी पोहोचण्यापूर्वीच हा प्रकार घडला. या घटनेची पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. इगतपुरी मतदारसंघातील महाविकास आघाडी- काँग्रेसचे उमेदवार लकी जाधव यांच्या प्रचारासाठी गुरुवारी त्र्यंबकेश्वर येथे खरगे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. तेथे पावसाळी वातावरण तयार झाले. त्यानंतर वादळी वारे वाहू लागले. आणि एका क्षणात मंच आणि मंडप कोसळला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अचानक झालेल्या या दुर्घटनेत काँग्रेसचे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. सुदैवाने अन्य कुणालाही इजा पोहोचली नाही. वादळी वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर मंडप आणि मंचाची उभारणी तातडीने करण्यात आली. व्याज दर कपात गरजेचीखाद्य महागाईशी जोडणे चुकीचे -पीयूष गोयल मुंबई/नवी दिल्ली - विकासकामांना गती देण्यासाठी व्याज दरात कपात गरजे असून खाद्यपदार्थांच्या महागाईशी त्याचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे मत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले.ते एका टि.व्ही.चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होते. याच कार्यक्रमात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दासही उपस्थित होते परंतु त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, ठोक महागाई दर ऑक्टोबर महिन्यात ४ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला असून तो आता २.३६ % झाला आहे. खाद्यपदार्थ,भाज्या,फळांच्या किमतीत वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. अनैतिक संबंधातून बीडला‎दगडाने ठेचून एकाचा खून‎ बीड‎ - अनैतिक संबंधातून एकाचा दगडाने‎ठेचून खून करण्यात आल्याची‎घटना बीड शहरात घडली. या‎प्रकरणी महिलेसह तिच्या‎प्रियकराला अटक करण्यात आली.‎शहर पोलिसांच्या डीबी पथकाने‎काही तासांतच या गुन्ह्याचा छडा‎ लावला.‎ शहरातील मोंढा रोडवर गुरुवारी‎सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह‎आढळून आला होता. दगडाने‎ठेचून या व्यक्तीचा खून केला गेला‎होता. मृतदेहाजवळ एक दुचाकीही‎होती. शहर पोलिसांना याची‎माहिती मिळाल्यानंतर पीआय‎शीतलकुमार बल्लाळ व डीबी‎पथकाने भेट दिली. मृत व्यक्तीची‎ओळख पटवली. त्याचे नाव‎सय्यद मजहर सय्यद अख्तर (४०,‎रा. मोहंमदिया कॉलनी, ह.मु.‎भिलवाडी तांदळा) असल्याचे‎समोर आले अनैतिक संबंधातून हा‎खून झाल्याचे समोर आले. या‎प्रकरणी पोलिसांनी लिंबाजी लक्ष्मण‎कानडे (४२) आणि अनिता‎नरसिंग अदमाने (३०, रा.‎माळीवेस, बीड) या दोघांना अटक‎केली. खुनाचा गुन्हा नोंदवला गेला.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article