टोळक्याने गाड्यांची तोडफोड केली.
Published on
:
19 Nov 2024, 6:44 am
Updated on
:
19 Nov 2024, 6:44 am
पंचवटी : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटात पुन्हा एकदा जोरदार राडा झाला.
पंचवटीतील आडगाव नाका परिसरातील लक्ष्मण रेषा या ठिकाणी गितेंचे काही कार्यकर्ते मतदानाच्या स्लीपा वाटत असतांना ढिकलेंच्या कार्यकर्त्यांना ते पैसे वाटत असल्याचा संशय आल्याने ढिकलेंच्या कार्यकर्त्यांनी गितेंच्या कार्यकर्त्यांना मारझोड केल्याची घटना घडली असून या टोळक्याने तेथे उभे असलेली काही गाड्या देखील फोडण्यात आल्या आहे.
घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्याने आडगाव नाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती कळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मारझोड केलेल्या कार्यकर्त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम उशिरापर्यंत पंचवटी पोलीस ठाण्यात सुरू असल्याचे समजते.