निल्लोड फाट्यावर 19 कोटींचे‎ सोन्या-चांदीचे दागिने पकडले:जळगावकडे जाणाऱ्या वाहनातून जप्त केला मुद्देमाल‎

6 days ago 2
तालुक्यातील निल्लोड फाट्यावरील‎चेकपोस्टवर स्थिर पथकाने‎संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या‎एका सराफा दुकानदाराचे जवळपास १९‎कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने पकडले.‎ही कारवाई गुरुवारी सायंकाळी करण्यात‎आली.‎ विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात सात‎ठिकाणी वाहन तपासणीसाठी स्थिर पथकाची‎स्थापना करण्यात आली आहे. यापैकी एक‎निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर‎सिल्लोड येथील स्थिर पथकाचे सहायक‎गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, आर.‎पी. गावंडे, एस. एस. भालेराव, संतोष पवार,‎आदींनी संभाजीनगरकडून जळगावकडे‎जाणाऱ्या वाहनाची (एमएच १२ व्हीटी‎८६२९) तपासणी केली असता त्यांना यात १९‎कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले.‎हे दागिने जळगाव येथील एका नामांकित‎सराफा ज्वेलर्सचे असल्याची माहिती अहिरे‎यांनी दिली. पथकाने दागिने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पकडूनजीएसटी पथकाच्या स्वाधीन केले‎आहेत. आता सदरील वाहन रात्री उशिरा‎शासकीय तंत्रनिकेतन कार्यालय येथे स्थापन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎करण्यात आलेल्या कार्यालयात आणण्यात‎आले. या ठिकाणी सहायक निवडणूक निर्णय‎अधिकारी लतीफ पठाण हे वाहनाची‎तपासणी करून माहिती देणार असल्याचे‎सांगण्यात आले. दागिने खरेदी आणि‎विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी‎संबंधितांना पाचारण करण्यात आले आहे.‎तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही‎पडताळणी केली जाणार आहे, असे‎अधिकाऱ्यांनी सांगितले.‎ कारवाईत हे प्रश्न अनुत्तरित‎‎ पकडलेले दागिने कुणाचे आहेत? ते कुठे‎नेले जात होते? दागिने खरेदीचे पक्के बिल‎आहे का? या व्यवहारात सर्व करांचा भरणा‎केला आहे का? याचा तपास सुरु आहे.‎ ‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article