Published on
:
18 Nov 2024, 12:05 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:05 am
बागलकोट : पंचहमी योजनेसाठी महसूल अपुरा पडत असल्याने अन्नभाग्य योजनेतील बीपीएल रेशनकार्ड रद्द करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. पण, त्यामध्ये तथ्य नाही. पात्र लाभार्थ्यांना मोफत रेशन अन्नधान्य वितरित केले जाणार आहे. अपात्रांची कार्डे रद्द केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहे.
बागलकोट दौर्यावर असणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पत्रकारांनी कोणत्याही विषयाशी संबंधित लिहिताना त्याची संपूर्ण माहिती घ्यावी. शहानिशा करूनच बातमी प्रसिद्ध करावी. अपात्र कार्डांना रेशन अन्नधान्य वितरित होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. केवळ पात्र कार्डधारकांनाच रेशन अन्नधान्य दिले जाणार आहे. प्राप्तिकर भरणारे, सरकारी कर्मचार्यांना बीपीएल रेशनकार्डधारकांना रेशन दुकानांतून रेशन मिळणार नाही.
भाजप नेते आर. अशोक यांनी भाजप सरकारवरील 40 टक्के कमिशनच्या आरोपातून मुक्त झाल्याचे सांगितले आहे. पण, कंत्राटदार संघाचे अध्यक्ष केंपण्णा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तपास सुरु आहे. साक्षीपुरावे नसल्याने संशयितांची सुटका होते. त्यांची सुटका झाल्याने खूनच झाला नाही असे म्हणता येत नाही. साक्षीदारांनी साक्ष दिली नसल्याने तपास सुरुच राहतो, असा टोमणा सिद्धरामय्यांनी हाणला.