शुभमंगल सोहळ्यामध्ये मतदान जागृतीसाठी वऱ्हाडी मंडळींना साकडे

2 hours ago 1
लोकशाही सुदृढ व सक्षम होण्याच्या दृष्टीने मतदानाची टक्केवारी वाढणे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने त्याला असलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागृत होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन आज १७ नोव्हेंबर रोजी सकाळी खामगाव येथील श्रीहरी लॉन्स मंगल कार्यालयामध्ये विजय धर्माळ यांची कन्या मयुरी व प्रतीक बोबडे यांचे चिरंजीव यश यांच्या विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. वरमाला हाती घेतलेल्या वर वधूंनी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना मतदानाला जाण्यासाठी आवाहन केले आणि भरलेल्या मंडपामध्ये "चला जाऊया मतदानाला" हा नारा गुंजला. जिल्हा परिषद बुलडाणा चे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्विप नोडल ऑफिसर बि.एम.मोहन व गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती खामगाव व शेगाव येथील अधिकारी/कर्मचारी यांनी विवाह सोहळ्यामध्ये भेट देऊन मतदान जागृतीचे कार्य केले, विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी त्यास उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमासाठी यावेळी गटविकास अधिकारी, शेगाव शेख, कृषी अधिकारी मानकर, राऊत, कृषी विस्तार अधिकारी इंगोले,फुटाणे, जोशी तसेच ग्रामपंचायत अधिकारी धनोकार, सोळंके व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article