पाटण : नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना अनिता देवकांत, सोबत उपस्थित नगरसेविका. Pudhari File Photo
Published on
:
08 Feb 2025, 12:36 am
Updated on
:
08 Feb 2025, 12:36 am
पाटण : पाटण नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. मंगल कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नगराध्यक्षा पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सौ. अनिता शशिकांत देवकांत यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्षा पदासाठी सौ. देवकांत यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नगराध्यक्षा पदाचा मार्ग मोकळा होणार आहे.
पाटण नगरपंचायतीमध्ये एकूण 17 सदस्य संख्या आहे. नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण असल्याने येथे यापूर्वी सौ. मंगल कांबळे या नगराध्यक्षा होत्या. त्यांनी राजीनामा दिल्यामुळे या रिक्त पदासाठी आता सौ. अनिता शशिकांत देवकांत यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नगराध्यक्ष पदासाठी 7 ते 13 फेब्रुवारी असा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सौ. देवकांत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने यातील तांत्रिक बाबी तपासल्यानंतर गुरुवार 13 फेब्रुवारी रोजी सौ. देवकांत यांच्या नगराध्यक्षा पदाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.