Published on
:
04 Feb 2025, 11:54 pm
Updated on
:
04 Feb 2025, 11:54 pm
बंगळूर : हल्ली अनेक बाबतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) वापर केला जात आहे. शिक्षण, नोकरी आणि आता स्वयंपाकघरातसुद्धा एआयचा शिरकाव होण्यास सुरुवात झाली आहे. आता तुम्हाला पोळी किती चांगली लाटता येते या तुमच्या कौशल्याला एआय गुण देणार आहे. अनेकदा तरुणींना त्यांची आई किंवा होणारी सासू पोळ्या गोल लाटता यायला पाहिजेत, असे आवर्जून सांगते आणि त्याला नकळत त्यांच्या शब्दात गुण देते. तर हेच काम आता ‘एआय’ करणार आहे.
आयटी खरगपूर येथील विद्यार्थ्याने RotiChecker. al नावाचे एआय टूल (AI For Roti) विकसित केले आहे. हे नवीन एआय टूल पोळीच्या गोलाकाराचे मूल्यांकन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच एआयचा वापर करते आणि 100 पैकी तुमच्या पोळीला किती गुण मिळणार हे सांगते. एखाद्याच्या पोळी बनवण्याच्या कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी हे एक मजेदार टूल आहे, असे म्हणायला हरकत नाही. एका सोशल मीडिया पोस्टमुळे उदयास आले. जेव्हा एका युजरने अगदी अभिमानाने तिच्या गोलाकार रोटीचा फोटो शेअर केला आणि ‘गोल पोळी बनवणेसुद्धा एक कला आहे’ (गोल रोटी बनाना भी एक आर्ट हैे) अशी कॅप्शन दिली. तर याच पोस्टपासून प्रेरित होऊन अनिमेश चौहान यांनी RotiChecker. ai तयार केले. युजरने पोस्ट केलेल्या पोळीला एआय टूलने 100 पैकी 91 गुण दिले आणि या टूलने (AI For Roti) पटकन लोकप्रियता मिळवली. युजरने त्यांच्या लाटलेल्या पोळीचा फोटो RotiChecker. रश्र वर अपलोड करायचा. त्यानंतर एआय पोळी किती गोल आहे याचे मूल्यांकन करते. त्यानंतर हे एआय टूल तुम्हाला 100 पैकी गुण देईल. तर अशा प्रकारे युजर्स त्यांच्या पोळी बनवण्याच्या कौशल्याचे मूल्यांकन करण्यासाठी एक मजेदार टूलची मदत घेऊ शकतात.