Prajakta Mali Phulwanti Movie Success Party : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालतो आहे. या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे. 'फुलवंती' या सिनेमाच्या या यशानंतर प्राजक्ता माळीने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला कलाकारांनी हजेरी लावली. वाचा...
प्राजक्ता माळीच्या सिनेमाची सक्सेस पार्टीImage Credit source: Instagram
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ‘फुलवंती’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. 11 ऑक्टोबरला ‘फुलवंती’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून आतापर्यंत हा सिनेमा थिएटरमध्ये हाऊसफुल होतोय. शिवाय ओटीटीवर देखील या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. प्रेक्षकांनी ओटीटीवर देखील या सिनेमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात प्राजक्ता माळीने ‘फुलवंती’ ही भूमिका साकारली. नुकचतंच या सिनेमाची सक्सेस पार्टी झाली. यावेळी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. अभिनेत्री अमृता खानविलकर ही देखील या सक्सेस पार्टीला हजर होती. यावेळी प्राजक्ता आणि अमृताने मदनमंजिरी गाण्यावर थिरकल्या.