मार्डी, कारंबामध्ये पाळीव प्राण्यांवर हल्ला:घाबरू नका, सजग राहा, वन विभागाचे आवाहन, वन पथकाकडून रात्री गस्त सुरू
6 days ago
2
सोलापूर शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर बिबट्याचा वावर सुरू असल्याचे पावलाच्या ठशाने निश्चित झाले आहे. माळढोक पक्षी अभयारण्य जवळील कारंबा येथे कालवडीचा गळा फाडणारा आणि मार्डी येथे रेडकूला ठार करणारा बिबट्याच असल्याचा दावा वन्यजीव तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान वन विभागाने दोन दिवसांपासून गस्त सुरू केली असून तो बिबट्या सदृश्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, पायाचे ठसे बिबट्याचेच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील चुनाभट्टी जवळील बाकिशा पिरसाब फकीर यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री बिबट्याने कालवडी वर हल्ला केला. गळ्याला गंभीर जखमा झाल्या असून पाठींवर नखं लागले आहेत. गोठ्यात मोठा आवाज आल्याने फकीर कुटुंबीय बाहेर येताच, बिबट्या जवळच्या पिकामध्ये पळून गेला. त्यांनी कालवडीच्या जखमांवर हळद लावली. बुधवारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या कालवडीवर उपचार केले. वस्तीच्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले . घाबरू नका सजग राहा, वन विभागाची गस्त सुरू ^मार्डी, कारंबा परिसरात गेल्या तीन दिवसांमध्ये दोन दुर्घटना घडल्याने वन विभागाने त्या परिसरात रात्री गस्त सुरु केली आहे. तसेच, काही भागामध्ये ट्रॅप कॅमेरा लावण्यात येत आहे. पायाचे ठसे, हल्ला बिबट्या सदृश प्राण्याने केला असावा. वाड्या-वस्त्यावरील लोकांना रात्री बाहेर फिरू नका, लहान मुलांना एकटे सोडू नका, पाळीव प्राण्यांना गोठ्यामध्ये बांधा. घाबरू नका, अजित शिंदे, सहाय्यक उप वनसंरक्षक
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)