रेवंत रेड्डी. File Photo
Published on
:
18 Nov 2024, 12:25 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:25 am
सोलापूर : नरेंद्र मोदी खोटी आश्वासने देऊन तिसर्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान झाले आहेत. आतापर्यंत दिलेल्या एकाही गॅरंटीची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यांच्या गॅरंटीची एक्स्पायरी संपली आहे. महाराष्ट्र त्यांना लुटायचा आहे. महाराष्ट्रातील धारावी हे त्यांचे टार्गेट आहे. ही निवडणूक गुजरातचे लुटारू विरुद्ध महाराष्ट्रातील जनता अशी आहे. त्यामुळे खोटं बोलणार्या महायुतीला साथ न देता महाविकास आघाडीला साथ द्या, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ रेड्डी सोलापुरात आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी, महायुती सरकावर टीका केली. वोट जिहाद भाजपचा छुुपा अजेंडा आहे. तेलंगणात काँग्रेसने दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केल्याचे ते म्हणाले.