बांदा ः महायुतीच्या सभेत बोलताना दीपक केसरकर. सोबत इतर पदाधिकारी. (छाया : विराज परब)
Published on
:
16 Nov 2024, 12:30 am
बांदा : तासातासाला पक्ष बदलणार्या राजन तेली यांच्या तोंडी निष्ठेच्या गोष्टी शोभत नाहीत. यावेळी ते नक्कीच पराभवाची हॅट्ट्रिक करतील, अशी टीका महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी बांदा येथे केली.
श्री स्वामी समर्थ सभागृहात आयोजित महायुतीच्या मेळाव्यात श्री. केसरकर बोलत होते. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, भाजप युवा मोर्चाचे लखमराजे भोसले, माजी सभापती प्रमोद कामत, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत, बाळा गावडे आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हे सर्वमान्य आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेऊन एकत्र यावे. जे कोणी अपक्ष उमेदवारांना मदत करत असतील त्यांना सोबत बोलावून घ्या. विकास काय असतो हे मी पालकमंत्री असताना मुंबई व कोल्हापूर येथे जाऊन पाहा.(Maharashtra assembly poll)
विशाल परबांची ईडी चौकशी झाल्यास...
अर्चना घारे या सावंतवाडी मसतदारसंघात नवीन आहेत. त्यांना इथल्या समस्यांची जाण नाही. विशाल परब हा केवळ फुगा आहे. उद्या त्यांची ईडी चौकशी झाल्यास त्यांच्यासोबत फिरणारे पण अडचणीत येतील, असा सूचक इशारा त्यांनी दिला.लखमराजे भोसले, प्रमोद कामत, श्ेवेता कोरगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दादू कविटकर यांनी केले. आभार उपसरपंच बाळू सावंत यांनी मानले.