Published on
:
18 Jan 2025, 12:58 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:58 am
गणपतीपुळे : गेल्या महिन्यापासून फरार असलेला आरोपी नितीन बोडके याला पकडण्यात गणपतीपुळे पोलिसांना यश आले आहे.
ग्रामीण पोलिस ठाणे रत्नागिरी यांच्याकडे दाखल गुन्ह्यातील आरोपी नितीन बोडके याला गणपतीपुळे पोलिस चौकी येथील पोलिस हवालदार नीलेश भागवत आणि ग्रामपंचायत गणपतीपुळेचे सुरक्षारक्षक महेश फडकले आणि ओमकार चव्हाण यांनी अथक प्रयत्न करून गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास गणपतीपुळे या ठिकाणी जेरबंद केले.
नितीन बोडके गेल्या एक महिन्यापासून फरार होता. त्याचा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून ठिकठिकाणी शोध सुरू होता. मात्र तरी देखील तो सापडत नव्हता. मात्र, गुरुवारी 16 जानेवारी रोजी त्याचे लोकेशन गणपतीपुळे या ठिकाणी असल्याचे ग्रामीण पोलिसांना दिसून आले. त्या नंतर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचार्यांनी गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार नितीन भागवत व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने संबंधित आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता गणपतीपुळे पोलीस चौकीचे पोलीस हवालदार निलेश भागवत यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सुरक्षारक्षक महेश फडकले आणि ओमकार चव्हाण यांच्या विशेष सहकार्याने संबंधित आरोपीचा शोध घेत पडकले.