राज-शर्मिला ठाकरेंचे मतदान:'अमित'च्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याचा आनंद; तर तावडेंच्या प्रकारावर राज यांचे मौन

1 day ago 1
आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस असल्याचे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने मतदारसंघाला एक चांगला उमेदवार लोकांना मिळाला, याचा आनंद त्यांना वाटत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळेच येथील मतदार हे आमच्यासाठी संवाद साधत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माहिम विधानसभा मतदारसंघातून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या मतदारसंघांमध्ये महायुती मनसेला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र अखेरपर्यंत ही लढत अटीतटीची ठरली. त्यामुळे या मतदारसंघांकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. ठाकरे घराण्यातील प्रत्यक्ष निवडणुकीत उतरवणारे अमित ठाकरे हे तिसरे ठाकरे आहेत. त्यामुळे मतदान करताना आपल्याला आनंद झाला असल्याचे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले आहे. जे म्हणालो होते, तेच घडले - राज ठाकरे माझ्या गुढीपाडव्याच्या सभेतच मी या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतील ज्या आजपर्यंत न झालेल्या आहेत, असे म्हणालो होतो. त्याप्रमाणे त्या दिसत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. जेवढे मतदान कमी होईल, तेवढे मतदारांच्या पदरी काय पडेल? हे पाच वर्षात पाहिले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला हवा. आपले मत व्यक्त करणे यापासून बाजूला हटणे, हा काही पर्याय नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. विनोद तावडेच्या प्रकाराबद्दल बालणे टाळले भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या प्रकाराबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे त्यांनी टाळले आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी मतदान करताना काय वाटले, असा प्रश्न राज ठाकरे यांना पत्रकारांनी विचारला असता, चांगली गोष्ट असल्याचे राज ठाकरे म्हणाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा.... अजित पवार यांचे मोठे वक्तव्य:'त्या' ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे - नाना पटोलेंचा; म्हणाले, एक बहीण तर दुसऱ्यांसोबत मी काम केले सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर बिटकॉइन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा या दोघांचाच आवाज असण्याची शक्यता वर्तवली आहे. या संदर्भात अजित पवार म्हणाले की, "जे काही ऑडिओ क्लिप दाखवले जात आहे, मला एवढेच माहित आहे की, मी या दोघांसोबत काम केले आहे. त्यापैकी एक माझी बहीण आहे. दुसरे असे आहेत ज्यांच्यासोबत मी काम केले आहे. त्यांचा आवाज मला ओळखता येतो. मात्र, या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि त्यानंतर सर्व 'राज' म्हणजेच सर्व सत्य स्पष्ट होईल.' पूर्ण बातमी वाचा.... 'जो जीता वही सिकंदर':काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार; भाजपकडून साम-दाम-दंड-भेदाचा वापर होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष हा साम-दाम-दंड-भेद आणि ईडी - सीबीआयच्या माध्यमातून दहशत निर्माण करून निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या मतदारसंघातील जनतेला केले आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या आहेत. तशी ही लढत देखील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, काडादी यांना काँग्रेसचा एबी फॉर्म न देऊन आपण महाआघाडीचा धर्म पाळला असल्याचा दावा देखील प्रणिती शिंदे यांनी केला आहे. इतकेच नाही तर 'जो जीता वही सिकंदर' असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. पूर्ण बातमी वाचा....

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article