लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. Pudhari File Photo
Published on
:
18 Jan 2025, 12:45 am
Updated on
:
18 Jan 2025, 12:45 am
कोल्हापूर : एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी अनिकेत साताप्पा हेरवाडकर (वय 23, रा. रायगड कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) याला अटक केली. दरम्यान, संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने अनिकेतने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्याची जबरदस्ती केली.
पीडित अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत आहे. वर्षापूर्वी सोशल मीडियाद्वारे तिची अनिकेत याच्याबरोबर ओळख झाली. त्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनिकेतने तिला लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ती त्याला भेटण्यासाठी गेली. एका हॉटेलमध्ये त्यांची भेट झाल्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर 25 जुलै 2024 ते 12 जानेवारी 2025 या कालावधीत तिला लॉजमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. तिच्या कुटुंबीयांनी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.