लाडक्या बहिणींचा मूड काय?:विधानसभा निवडणुकीत कोणाला देणार कौल, जाणून घ्या ताईंची बेधडक मते, फक्त 'दिव्य मराठी डिजिटल'वर
1 hour ago
1
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सर्वत्र प्रचाराचा एकच धुरळा उडालाय. काही मोजके दिवस बाकी असताना महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोघांकडूनही लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जातोय. महिलांचे मतदान या निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते का? हे जाणून घेण्यासाठी 'दिव्य मराठी डिजिटल'ने विविध क्षेत्रातल्या महिलांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी आम्हाला फुकट पैसे नको पण आमच्या मुलांना नोकऱ्या हव्या असा आग्रह धरला. सर्वसामान्य महिला मतदार म्हणाल्या, कोणतेही सरकार आले तरी महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवा. तेल, तांदूळ, साखर या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत दिंवसेंदिवस वाढ होत आहे. दिड हजार, 3 हजार कितीही पैसे दिले तरी वाढत्या महागाईपुढे ते थोडे वाटतात. या वस्तुंचे भाव स्थिर राहिले तर गृहिणींना मदत होऊ शकते. यावेळी काही महिलांनी एकनाथ शिंदे आपला लाडका भाऊ असल्याचेही म्हटले. काही महिलांनी फुकट पैसे देण्यापेक्षा महिलांसाठी रोजगार उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांवर भर देण्यात आला आहे. म्हणजेच महिला मतदारांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकार आल्यास महालक्ष्मी योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. त्यात माझी लाडकी बहीण योजनेपेक्षा दुप्पट पैसे म्हणजेच तीन हजार रुपये दर महिन्याला महिलांना देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे. राज्यांत यंदा महिला मतदारांमध्ये 10.77 लाखांची वाढ झाली आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)