Published on
:
03 Dec 2024, 9:30 am
लातूर, पुढारी वृत्तसेवा : येथील अतिरिक्त एमआयडीसी भागात असलेल्या अरिहंत व्हेज ऑईल प्रा. लि. या कंपनीची बनावट कागदपत्रे बनवून काही जणांनी ५ कोटी ७८ लाख रूपयाची फसवणूक केली.
याप्रकरणी उत्कर्ष संगवे (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल बजरंगे, वैभव बजरंगे, राजकुमार जाधव, रा. लातूर यांच्यासह अन्यजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डी-७० अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे ही. कंपनी आहे. या कंपनीतील उत्पादनात वजनात फेरबदल करणे, सोयाबीन परिक्षण गुणवत्तेत फेरबदल, बनावट कागदपत्रे तयार करून या कंपनीची उपरोक्त व्यक्तींनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.