लारा सांगते की, ती आणि तिचा एक्स-हसबंड रोजर युनायटेड किंगडमच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये साधं आयुष्य जगत होते. त्याच वेळी तिने 1.8 मिलियन पाऊंड (सुमारे 20 करोड रुपये) जिंकले. परंतु, लारा ग्रिफिथ्सचा आनंद दीर्घकाळ टिकला नाही. घराला आग लागली आणि नंतर तिने नवर्यापासून घटस्फोट घेतल्यामुळे तिची सगळी संपत्ती नष्ट झाली. लारा म्हणते, त्यावेळी मला खरंच माहीत नव्हतं की या पैशांचं काय करावं? पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं यावर रोजर आणि माझी कधी चर्चा झालीय असं आठवत नाही. त्या काळात आम्ही शानदार जीवन जगत होतो, पैसे उडवत होतो, जणूकाही उद्या कधीही येणार नाही, अशा अर्विभावातच आम्ही जगत होतो. मी नोकरी सोडली आणि दुबई, फ्लोरिडा, फ्रान्ससारख्या आकर्षक ठिकाणी फिरायला गेले. त्यांनी 1.5 लाख पाऊंड (सुमारे 1.6 करोड रुपये) किमतीचं एक ब्युटी सलून विकत घेतलं आणि 4.5 लाख पाऊंड (सुमारे 4.8 करोड रुपये) किमतीचं आलिशान घर विकत घेतलं. पण 2010 मध्ये मोठं संकट आलं, त्यांचं आलिशान घर जळून खाक झालं. लारा सांगते, ‘आमच्या घरात प्रचंड आग लागली होती. घर तीन दिवसांपर्यंत जळत राहिलं. आमची सर्व संपत्ती नष्ट झाली.’ या आगीमुळे लारा आणि तिचं कुटुंब 8 महिने होटेल्समध्ये आणि तिच्या आईकडे राहत होते. या कालावधीत तिच्या घराची दुरुस्ती सुरू होती. 2011 मध्ये लारा आणि तिच्या कुटुंबाने आपलं घर परत मिळवलं, पण त्याच्या नंतरची स्थिती अजूनही वाईट होती. काही महिन्यांनंतर रोजर आणि तिचा घटस्फोट झाला. त्या दोन वर्षांच्या काळात अगदी नरकासारखी स्थिती होती, असं ती म्हणते. तिचं हृदय तुटलं होतं, पण मुलींचं पालनपोषण करायचं होतं. 2013 मध्ये घटस्फोट होऊन लारा कंगाल झाली आणि तिला तिचं घर आणि सलून विकावं लागलं. लारा सांगते की, आग लागल्यामुळे तिच्या मुलीच्या मनावर मोठा परिणाम झाला, आणि ती अनेक वेळा बेचैन असायची. लारा स्वतःही आजारी होती, पण मुलींच्या काळजीसाठी तिने संघर्ष सोडला नाही. आजही लारा आपल्या मुली रुबी (वय 20) आणि किट्टी (वय 17) यांच्यासोबत राहते. लॉटरी जिंकून सर्व संघर्षांचा सामना करूनही लारा म्हणते, आता मला माझं जीवन आवडतं. हो, मी काही खूप कठीण काळातून गेले, पण मला त्याचं वाईट वाटत नाही!
लॉटरीत ‘तिने’ 20 कोटी जिंकले तरीही...
2 hours ago
1
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)
Watch Live | Source Article- Homepage
- Marathi News
- लॉटरीत ‘तिने’ 20 कोटी जिंकले तरीही...
Related
राज्यात वाढणार थंडीचा कडाका; पुण्याचा पारा 9.5 अंशांवर
3 minutes ago
0
काँग्रेसने दगाबाजीने उमेदवार जाहीर केला:खासदार प्रणिती शिंदे...
5 minutes ago
0
पातूर तालुक्यात शेतकऱ्यांना डिसेंबरपासून पाणी:पातूरात कालवा ...
11 minutes ago
0
अवैध सावकारावर छापे; बाजार समितीसह तीन ठिकाणांहून आक्षेपार्ह...
12 minutes ago
0
बौद्ध समाजाचे राजकीय अस्तित्व धोक्यात; जागृती करणे आवश्यक:प्...
14 minutes ago
0
प्रवासी तिकीट बुक करण्यातून 72 हजारांचा ऑनलाईन गंडा
15 minutes ago
0
खामगावात शिवाजी व्यायाम मंदिर येथे कबड्डी निवड चाचणी स्पर्...
15 minutes ago
0
मोहेगाव शिवारात कारवाई; पोलिसांनी पकडला गांजा:2 लाख 59 हजार ...
16 minutes ago
0
मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, ...
20 minutes ago
0
अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणारी तीन वाहने पकडली:महसूल विभा...
22 minutes ago
0
शेगाव रेल्वे स्थानकावर 9 एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा दे...
22 minutes ago
0
Horoscope Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा ...
23 minutes ago
0
© Rss Finder Online 2024. All Rights Reserved. | Designed by MyHostiT