शेती, उद्योगाला झुकते माप; महागाईकडे कानाडोळा:केंद्राच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया; शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, उद्योग क्षेत्रांकडे विशेष भर‎

2 hours ago 2
अकोला आगामी आर्थिक वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प शनिवारी सादर करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यटन आणि उद्योग क्षेत्रांकडे विशेष भर देण्यात आला. मात्र, सर्वसामान्यांच्या कोणत्या अपेक्षा अपूर्ण राहिला? बजेटच्या घोषणा समाधानकारक आहेत का? यावर अकोल्यातील काही तज्ञ मंडळी आणि सामान्यांच्या प्रतिक्रिया आवश्यक ठरतात. ^१२ लाखापर्यंत करमुक्तीची घोषणा झाली ती नोकरदार वर्गासाठी थोडी दिलासादायक वाटत आहे. याचा किती फायदा होईल, हे करपरतावा भरल्यावरच कळेल. शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्यात मात्र शेतीपूरक वस्तू ज्या स्वस्त होतील, अशी, अपेक्षा होती. ती मात्र फोल ठरली. आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी होईल, अशी सर्वांची अपेक्षा होती. त्याबाबत मात्र अपेक्षाभंग झाला, केली. अर्थसंकल्पातील घोषणा पूर्णत्वास जातील, अशी अपेक्षा आहे. डॉ. प्रसन्नजीत गवई, सीताबाई कॉलेज. महागाईपासून दिलासा नाही ^अनेक गोष्टींत सर्वसामान्यांची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे. १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त दाखवले असले तरी १२ लाखापर्यंत ६० हजार टॅक्स भरावा लागणार आहे. त्यानंतर त्याचा परतावा मिळणार आहे. या १२ लाखात जर तुमच्या ठेवींतून मिळणारे उत्पन्न असेल तर ते करमुक्त नसणार आहे. महागाई जर कमीच करायची आहे तर पेट्रोल- डिझेलचे दर कमी करणे गरजेचे होते ते झालेले नाही. यावेळी आंध्र प्रदेशावर विशेष कृपा या सरकारने केली. बिहारसाठी तर डझनभर योजना आणल्या आहेत. त्यामुळे हे बजेट जनतेसाठी नसून, सरकारच्या मित्रपक्षांसाठी असल्याची खात्री पटते. डॉ. समृद्धी तिडके गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली ^भारत सरकारचा हे बजेट मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे. आयकर दरात बदल , कर प्रणाली सुलभ करण्याच्या प्रक्रियेमुळे वैयक्तिक आर्थिक स्थिती सुधारेल, असे नाही, तर आर्थिक विकासाला चालना मिळेल. या बजेटमध्ये स्टार्ट-अप्स , गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. ज्यामुळे नवीन व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगाराच्या संधी वाढतील. हे बजेट सामान्य नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक असून, ते आर्थिक वाढीस चालना देण्यासोबतच सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणेल. -अॅड. आशिष बाहेती , अर्थ व कर सल्लागार. करमुक्तीचा निर्णय महत्त्वाचा ^हे बजेट ऐतिहासिक आहे. १२ लाखापर्यंत उत्पन्नापर्यंत करमुक्ती दिली आहे. ५०० कोटी टर्नओव्हर पर्यंत एमएसएमई, कस्टमड्युटी, एज्युकेशन, उडान आदी नवीन बदल आहे. उद्योग क्षेत्र, सामान्यांसाठी बजेट दिलासादायक आहे. - सिद्धार्थ रुहाटिया, उपाध्यक्ष,विदर्भ चेंबर.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article