सिल्लोडमध्ये आदिवासी कोळी वैधता प्रमाणपत्रासाठी युवक आक्रमक:पालकमंत्री सत्तारांच्या कार्यालयासमोर डिझेल अंगावर ओतून युवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

2 hours ago 1
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी कोळी समाजाच्या आठ युवकांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यात तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू अाहेत. आदिवासी कोळी समाजबांधवांनी यापूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आदिवासी कोळी समाजाचा मुख्य प्रश्न, आदिवास कोळी मल्हार जमात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी व इतर प्रश्न निकाली काढण्यासाठी तत्काळ मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून प्रश्न सोडवू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र, समस्या न सोडवल्याने युवकांनी सत्तार यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित लोकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांत राजू दांडगे, दीपक सुरडकर, रवींद्र इंगळे, सीताराम पाडळे, दयानंद शेवाळे, दिनेश तांबे आदी युवकांचा समावेश आहे. त्यातील रवींद्र, दीपक व राजू यांच्यावर सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेषराव उदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी यातील काही आंदोलकांना अटक करून सायंकाळी समज देऊन सोडून दिले. सिल्लोड येथे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या कोळी समाजबांधवांवर सिल्लोडच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे नेण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या छातीवर व डोळ्यात डिझेल उडाले आम्ही दुपारी दीड वाजता कार्यालयासमोर पोहाेचलो. कार्यालयाच्या पायऱ्यावर पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अात येऊ न देता तेथेच थांबवले. आम्ही सर्व कार्यालयात गेलो असता त्यांनी पोलिसांना पाचारण केले. याचदरम्यान तीन युवकांनी स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले. सोबतच्या इतर युवकांच्या छातीवर व डोळ्यात डिझेल उडाले. - अंबादास सुरडकर, तालुका सचिव, धाडस संघटना

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article