रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करणार असल्याची चर्चा होत होती. त्यापूर्वीच हे छापा सत्र झाले. 17 तासांहून अधिक काळ चौकशी चालली. यंत्रणा त्यांच्या घरी ठाण मांडून होती. त्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. आयकर विभागाच्या छाप्यावर रघुनाथ राजे नाईक निंबाळकर खणखणीत प्रतिक्रिया आली आहे.
हे दोन नंबरचे घर नाही
या सर्व छापा सत्रानंतर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी यंत्रणांची शाब्दिक धुलाई केली आहे. काळजीचे काहीही कारण नाही. महाराष्ट्रात काही क्लिअर कुटुंब आहेत. लोकांनी अश्वस्त राहावं. यामध्ये काही निष्पन्न होणार नाही. हाच वेळ इतर लोकांसाठी दिला तर बरे होईल. कोणतीही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचे हिशोब उत्तर या ठिकाणी आहे, असे ते म्हणाले.
हे सुद्धा वाचा
जुनी घरे आहेत ही अशा पद्धतीने टार्गेट करणे योग्य नाही. हा प्रक्रियेचा भाग आहे. झाले ते योग्य झाले. साप साप म्हणून भुई थोपटत होते ते बंद झाले. चौकशीसाठी आलेले लोक सुद्धा रिस्पेक्ट फुल आहेत. त्यांच्यासमोरही लक्षात आले आहे हे दोन नंबरचे घर नाही. संजीवराजे यांच्या जवळ प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे, असे ते म्हणाले.
हा तर राँग नंबर
या छापेमारीमुळे नाईक निंबाळकरांच्या समर्थक, कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेक जण हा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप करत आहेत. त्यावर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी काळजी न करण्याचे आवाहन केले आहे. समर्थकांना काळजी वाटत आहे पण काळजीच काही कारण नाही. त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारी नाही… हा बिहार नाही. मालोजीराजांच्या काळापासून हे घर व्यवस्थित राहिले आहे. पैशाचे ढीग सापडतील असं वाटलं होतं. पण असं काही नाही. कायमस्वरूपी जे काय आहे ते सर्व जून आहे. नवीन काहीच नाही. विरोधक जरी बोलत असतील तरी मला या ठिकाणी काही मिळेल, असे वाटत नाही. हा रॉंग नंबर आहे. लोकांनी काही काळजी करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.