Ladki Bahin Yojana interaction successful assembly predetermination 2024 : महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या.
राज्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा चांगलाच बोलबाला पाहायला मिळाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या. विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडे सात हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले. मात्र विरोधकांकडून यावरून सत्ताधाऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली. तर लाडक्या बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा सुरू होती. दरम्यान, महायुतीच्या बड्या नेत्यांकडून विधानसभेच्या प्रचारसभांमधून लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इतकेच नाहीतर या योजनेच्या लाभार्थी महिला महायुतीला नक्की मतदान करणार असा विश्वास महायुतीच्या बड्या नेत्यांकडून प्रचारसभांमधून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, खरंच लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा होणार की नाही? काय म्हणाले, तज्ज्ञ संजीव उन्हाळे…
Published on: Nov 20, 2024 07:43 PM