सांगली : आमदार सुधीर गाडगीळ यांच्या विजयानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोठ्या जल्लोषात मिरवणूक निघाली.Pudhari File Photo
Published on
:
23 Nov 2024, 11:58 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:58 pm
सांगली : भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांनी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यावर 36 हजार 135 मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि गाडगीळ यांच्या विजयाची हॅट्ट्रिक झाली. गाडगीळ यांना 1 लाख 12 हजार 498 मते मिळाली, पृथ्वीराज पाटील यांना 76 हजार 363, तर काँग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांना 32 हजार 736 मते मिळाली. येथे काँग्रेसला बंडखोरी नडली. जयश्री पाटील यांच्यासह 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.
पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ आघाडीवर होते. पाच फेर्यांनंतरही गाडगीळ यांची आघाडी कायम राहिली. त्यामुळे काँग्रेस समर्थकांमध्ये तणाव पसरत गेला, तर भाजपच्या गोटात विजयाचा आत्मविश्वास वाढत गेला. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत अखेरच्या फेरीपर्यंत भाजपाला विजय हुलकावणी देत होता. त्यामुळे भाजपचे नेते, कार्यकर्ते यावेळी थोडे सबुरीने घेत फेरीनिहाय मताधिक्याकडे लक्ष देऊन होते. सातव्या फेरीत आमदार गाडगीळ यांनी पंधरा हजारांवर मताधिक्य घेतले आणि भाजप समर्थकांनी जल्लोष सुरू केला.
पहिल्या फेरीत सुधीर गाडगीळ यांना 6 हजार 781, पृथ्वीराज पाटील यांना 4 हजार 796, तर जयश्री पाटील यांना 3 हजार 267 मते मिळाली. गाडगीळ यांना 1 हजार 985 चे मताधिक्य मिळाले. दुसर्या फेरीअखेर गाडगीळ यांना 13 हजार 956, पृथ्वीराज पाटील यांना 8 हजार 694, तर जयश्री पाटील यांना 6 हजार 236 मते मिळाली. दुसर्या फेरीअखेर गाडगीळ यांना 5 हजार 262 मताधिक्य मिळाले. तिसर्या फेरीअखेर मताधिक्य 7 हजार 487 झाले. गाडगीळ यांचे मताधिक्य फेरीनिहाय वाढतच गेले. चौथ्या फेरीत ते 9 हजार 336 झाले. पाचव्या फेरीत 11 हजार 28, सहाव्या फेरीत 14 हजार 544, सातव्या फेरीत 15 हजार 961 असे मताधिक्य वाढत गेले. आठव्या फेरीअखेर सुधीर गाडगीळ यांना 54 हजार 64 मते मिळाली. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील यांना 35 हजार 700, तर अपक्ष जयश्री पाटील यांना 19 हजार 368 मते मिळाली. आमदार गाडगीळ यांनी 18 हजार 364 चे मताधिक्य घेतले. नवव्या फेरीत मताधिक्य 22 हजार 23, तर दहाव्या फेरीत 25 हजार 44 झाले. दहाव्या फेरीअखेर आमदार गाडगीळ यांना 70 हजार 200, पृथ्वीराज पाटील यांना 45 हजार 156, तर जयश्री पाटील यांना 22 हजार 446 मते मिळाली.
बाराव्या फेरीत मताधिक्य घटले
अकराव्या फेरीपर्यंत आमदार गाडगीळ यांना प्रत्येक फेरीत मताधिक्य मिळत गेले. बाराव्या फेरीत मात्र आमदार गाडगीळ यांचे मताधिक्य 2 हजार 923 ने कमी झाले. बाराव्या फेरीअखेर सुधीर गाडगीळ यांना 83 हजार 315 मते मिळाली. पृथ्वीराज पाटील यांना 56 हजार 589, जयश्री पाटील यांना 25 हजार 683 मते मिळाली. तेराव्या फेरीअखेर गाडगीळ यांना 92 हजार 157, पृथ्वीराज पाटील यांना 59 हजार 921, तर जयश्री पाटील यांना 27 हजार 5 मते मिळाली. चौदाव्या फेरीअखेर गाडगीळ यांना 32 हजार 609, तर पंधराव्या फेरीअखेर 33 हजार 661 मताधिक्य मिळाले. अंतिम फेरी सोळावी होती. या फेरीत पोस्टल मतांचा समावेश करून मते मोजण्यात आली. सोळाव्या फेरीअखेर सुधीर गाडगीळ यांना 1 लाख 12 हजार 498 मते, पृथ्वीराज पाटील यांना 76 हजार 363, तर जयश्री पाटील यांना 32 हजार 736 मते मिळाली. भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांनी 36 हजार 135 मतांनी विजय मिळवला.