Published on
:
19 Nov 2024, 10:22 am
Updated on
:
19 Nov 2024, 10:22 am
संभाजीनगर: शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात कॉट की टक्कर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि शिंदे गटाचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्यासमोर एमआयएमने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यात ठाकरे गटानेही विरोधात मराठा बेहरा उतरवून जैस्वाल यांची कोंडी केली आहे. प्रचारातही त्यांनी आघाडी घेतल्याने जैस्वाल यांचा चांगलाच कस लागत आहे. तरी मतविभाजनावरच या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याने विजयाचा गुलाल कोण उधळणार, हे २३ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचा महासंग्राम सुरू असून मंगळवारी (दि.१८) प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तरी अखेरच्या क्षणापर्यंत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू होती. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे जैस्वाल, ठाकरे गटाचे बाळासाहेव थोरात आणि एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे.
मुख्य महणजे शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने हिंदू मतांचे विभाजन होणार आहे. ते टाळणे जैस्वाल यांना जवळपास अशक्य आहे. त्यातही ठाकरे गटाने घोरात यांच्यासारखा मराठा चेहरा विरोधात उतरवून जैस्वाल यांची कोंडी केली आहे. एकीकडे एमआयएम आणि दुसरीकडे ठाकरे गट असे दुहेरी तगडे आव्हान जैस्वाल यांच्यासमोर उभे आहे.
मध्य मतदारसंघ
जमेच्या बाजू
मराठा आणि सर्वात तरूण चेहरा
महाविकास आघाडीचे पाठबळ
मराठा मतदारांचा प्रतिसाद
ठाकरे गटाचे पारंपरिक मतदार
कमकुवत बाजू
राजकिय अनुभव तोकडे
ऐनवेळी उमेदवारी मिळाली
मत विभाजन टाळण्याचे आव्हान
जमेच्या बाजू
मतदारसंघाचे विद्यमान आमदार
कोट्यावधींची विकास कामे केल्याचा दावा
सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध
तळगाळापर्यत ओळख, सहज उपलब्ध
कमकुवत बाजू
जुने निष्ठावंत कार्यकर्ते दुरावले
कंत्राट जवळच्यांना दिल्याचा आरोप
कार्यकर्त्यांमध्येच अतर्गत धुसफूस- नाराजी
जनसंपर्क तुटला, मत विभाजन टाळण्याचे आव्हान
जमेच्या बाजू
नगरसेवक म्हणून पाचवर्ष कामे
२०१९ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते
मतदारसंघात चांगली प्रतिमा
लोकसभेला एमआयएम पडलेली मते
कमकुवत बाजू
एमआयएमच्या नेत्यांवर मदार
अल्पसंख्याक मतदारांवर भिस्त
पक्षात संघटनात्मक पकड नाही
वंचितमुळे मत विभागणीचे आव्हान