हे पाप ज्यांनी केले, त्यांना शेतकर्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांच्या सहकार्यातून आपण या तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा, व्यावसायिकांना उद्योग सुरू करता यावेत म्हणून जंक्शन येथे एमआयडीसी मंजूर केली आहे. येणार्या काळात या एमआयडीसीचा जनतेला मोठा फायदा होणार आहे.
यापुढील काळात आपण तालुक्यातील गावोगावी महिला अस्मिता भवन, ग्राम अभ्यासिका उभारणार आहोत. शिवाय येणार्या पाच वर्षांत आपण तालुक्यातील शेतीला पुढील 100 वर्षे पुरेल असे शाश्वत पाणी नियोजन करणार आहोत. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. जातीपातीचे विष पेरणार्यांना थारा देऊ नका, असे म्हणत उद्याच्या निवडणुकीत मला निवडून द्यावे, असे आवाहन आ. भरणे यांनी केले.
या वेळी युवराज पोळ यांनी भीमशक्ती सामाजिक संघटनेचा आमदार भरणेंना जाहीर पाठिंबा दिला. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष संजय सोनवणे, हनुमंत कोकाटे, तानाजी थोरात, डॉ. शशिकांत तरंगे, माऊली वाघमोडे, शुभम निंबाळकर, डॉ. लक्ष्मण कदम, अण्णासाहेब काळे, बाळासाहेब सरवदे, मनोज जगदाळे, अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, युवराज म्हस्के, अण्णासाहेब काटे, शिवाजी मखरे, चित्रा ढोले आदींची भाषणे झाली.
मित्रहो, बेइमानी करायची नाही
या वेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, तालुक्यात जातीचे विष पेरण्याचे काम सुरू आहे. त्याला बळी पडू नका. आपण जातिवंत व प्रामाणिक आहोत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत दत्तामामाला मतदान करून निवडून आणू.