आ. मकरंद पाटीलFile Photo
Published on
:
02 Feb 2025, 12:20 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:20 am
सातारा : प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात हरवलेली वृद्ध महिला अखेर वाराणसी येथे सापडली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे व उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने तिला सुखरूप शोधण्यात यश आले.
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महिलेचा तिच्या मुलासोबत फोनवर संवाद साधून दिला गेला आहे. उषाबाई लक्ष्मण बोरले (रा. मलकापूर, बुलढाणा) या आपल्या सहकार्यांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेल्या होत्या. मात्र, गर्दीमध्ये त्या हरवल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या महिलेशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता पसरली होती.
महिलेच्या बेपत्ता होण्याची माहिती मिळताच पालकमंत्री मकरंद पाटील, बुलढाणा जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर, समन्वयातून महिलेचा ठावठिकाणा वाराणसी येथे लागला. दरम्यान, या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालकमंत्री, प्रशासनाच्या तत्परतेने दिलासा
पालकमंत्री मकरंद पाटील यांनी उत्तर प्रदेश सरकारशी समन्वय साधून महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी तिला सुरक्षितस्थळी हलवून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मदत केली.