मेढा पोलिसांनी धडक कारवाई करत संशयिताला अटक केली. त्यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी.Pudhari Photo
Published on
:
02 Feb 2025, 12:30 am
Updated on
:
02 Feb 2025, 12:30 am
मेढा : मेढा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात महत्त्वपूर्ण कारवाई केली असून, आरोपीला जेरबंद करून त्याच्याकडून 6300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा करून आरोपीला ताब्यात घेतले.
दि. 23 जानेवारी रोजी रात्री सायगाव (ता. जावली) येथील एका दुकानात चोरी झाली होती. चोरट्याने दुकानाच्या कुलूप तोडून रोख रक्कम आणि मोबाईल फोनसह इतर मुद्देमाल चोरला होता. मेढा पोलिसांनी दिलेल्या सूचनांच्या आधारे तपास सुरु केला आणि माहितीच्या आधारे आरोपी आदित्य विकास चव्हाण (वय 20) याला अटक केली. त्याच्याकडून 6300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली.