पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आऊट

1 hour ago 1

आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरमध्ये महायुतीने मुसंडी मारली.Pudhari File Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

23 Nov 2024, 11:33 pm

Updated on

23 Nov 2024, 11:33 pm

पालघर : आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरमध्ये महायुतीने मुसंडी मारली असून विक्रमगड, वसई, नालासोपारा, बोईसर आणि पालघर अशा पाच जागा जिंकल्या आहेत. येथे बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, त्यांचा बालेकिल्ला ढासळला आहे. ‘बविआ’चे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांचे अन्य दोन्ही उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला होता; पण त्यांच्यावरच डाव उलटला आहे. अनपेक्षितपणे ‘सीपीएम’ने मात्र आपला गड राखला आहे.

पालघरमध्ये राजेंद्र गावीत

पालघर मुख्यालयात निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिंदे शिवसेनेत गेलेले राजेंद्र गावीत यांनी मोठे यश मिळवले असून, जवळपास 40 हजारांच्या मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 1 लाख 12 हजार 894 मते मिळाली, तर त्यांचेच प्रतिस्पर्धी ठाकरे गटाचे जयेंद्र दुबळा 72 हजार 557, तर मनसेच्या कोरडा यांना 10 हजार मते मिळाली. त्यामुळे बॅकफूटवर गेलेले गावीत पुन्हा एकदा फ्रंटफूटला आले आहेत.

दुसर्‍या बाजूला डहाणूचा गड माकपने राखला असून, विनोद निकोले यांना 1 लाख 4 हजार 702, तर भाजपचे विनोद मेढा यांना 99 हजार 559 मते मिळाली. विनोद निकोले यांनी आपला गड राखला आहे.

विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचा गड ढासळला आहे. येथे विद्यमान आमदार सुनील भुसारा यांना पराभवाचा धक्का बसला. हरिश्चंद्र भोये हे 1 लाख 14 हजार 514 मते घेत विजयी झाले आहेत. त्यांना सुनील भुसारा यांच्यापेक्षा 40 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे. भुसारा यांना 72 हजार 482 मते मिळाली, तर जि.प.चे विद्यमान अध्यक्ष प्रकाश निकम यांना 32 हजार मते मिळाली.

वसईत हितेंद्र ठाकूर यांना धक्का

वसईमध्ये अनपेक्षितपणे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. भाजपच्या नवख्या उमेदवार स्नेहा दुबे पंडित यांना 77 हजार 279 मते मिळाली. काँग्रेसचे विजय पाटील यांना 61 हजार 874 मते मिळाली. लोकसभेला निकाल विरोधात जाऊनही महाविकास आघाडीबरोबर न जाण्याचा निर्णय बहुजन विकास आघाडीला गोत्यात आणण्याचा ठरला, तर महायुतीचा उमेदवार देण्याचा निर्णय फळाला आला आहे. हितेंद्र ठाकूर यांना 74 हजार 4 मते मिळाली आहेत. बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या वसई मतदारसंघात ‘बविआ’चा पराभव झाला आहे.

भाजपच्या राजन नाईक यांना नालासोपारा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले असून, त्यांना 1 लाख 64 हजार 243 मते मिळाली आहेत, तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला असून, त्यांना 1 लाख 27 हजार 238 मते मिळाली आहेत.

बोईसरमध्ये विलास तरे यांची बाजी

बोईसर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांनी बाजी मारली असून, त्यांना 1 लाख 26 हजार 117 मते मिळाली आहेत, तर बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 81 हजार 662 मते मिळाली आहेत.

तिथेही भाजपचा दणदणीत विजय

मतदानाच्या आधी एक दिवस नालासोपारा मतदारसंघ चर्चेत आला तो पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप ‘बविआ’ने केला होता. विनोद तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. त्या मतदारसंघातही भाजपने दणदणीत विजय मिळविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article