भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या (बाविआ) कार्यकर्त्यांनी घेरल्याची घटना घडली आहे.(Pudhari Photo)
Published on
:
19 Nov 2024, 9:19 am
Updated on
:
19 Nov 2024, 9:19 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या (बाविआ) कार्यकर्त्यांनी घेरल्याची घटना घडली आहे. त्यातून भाजप आणि बाविघा कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षीतिज ठाकूर या हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.
विरार पूर्व भागात असलेल्या मनवेलपाडा येथे एका हॉटेलमध्ये तावडे पैसे वाटप करत आहेत, असा आरोप करत बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरले. त्यातून बाविआचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात चांगली जुंपली. काही वेळातच आमदार क्षीतिज ठाकूरही तेथे पोहोचले.
या प्रकरणानंतर हॉटेलमध्ये मोठा पोलिस फाटा तैनात करावा लागला, तसेच पोलिसांनी हॉटेल सील केल्याचेही सांगितले जात आहे.
पोलीस आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी- विनोद तावडे
दरम्यान, या घटनेवर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी विनोद तावडे यांनी केली आहे.