देवगड ः किल्ला गणपती मंदिर येथे सत्कारप्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे. (छाया ः वैभव केळकर)
Published on
:
03 Feb 2025, 12:52 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:52 am
देवगड ः गतवर्षीच्या गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी दर्शनासाठी आलो होतो. यावेळी या न्यासाचे अध्यक्ष नंदकुमार घाटे यांनी आपला आमदार मंत्री बनून येऊन देत असे साकडे गणरायाकडे घातले होते. ते आज खर्या अर्थाने पूर्ण होत असून मत्स्य, बंदर विकास मंत्री व पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आता जबाबदारी आली आहे. माझ्या मंत्रिपदात देवगड तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. देवगड तालुक्यातील जनतेबरोबर येथील मच्छीमारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी मी मंत्रिपदाचा वापर करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय, बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड किल्ला येथील गणेश जयंती उत्सवादरम्यान केले.
श्री गणपती मंदिर उत्सव समिती देवगड किल्ला मंडळाच्यावतीने अध्यक्ष नंदकुमार घाटे यांच्या हस्ते मंत्री नितेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. माजी आमदार अॅड. अजित गोगटे, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बाळा खडपे उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, दयानंद पाटील, नगरसेवक सौ. तन्वी चांदोस्कर, सौ.सावी लोके, न्यासाचे उपाध्यक्ष शिवराम निकम,सदस्य गुरुनाथ वाडेकर, केदार तेली, उल्हास मणचेकर, अमित गोळवणकर आदी उपस्थित होते.
देवगड किल्ला येथे गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने सकाळी श्रींची पूजा, अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.स्थानिक भजने तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.