वाकाव येथे जयवंत बंगल्यावर सावंतांच्या विजयानंतर जल्लोष साजरा करताना प्रा. शिवाजीराव सावंत शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ.Pudhari Photo
Published on
:
25 Nov 2024, 12:10 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:10 am
माढा : माढा तालुक्याचे सुपुत्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी भूम-परांडा विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत सलग दुसर्यांदा विजय संपादन केला. त्यांच्या विजयानंतर माढा व वाकाव येथे कार्यकर्त्यांनी आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी गत विधानसभेत याच मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.
यंदा सावंत यांची शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल मोटे यांच्याशी लढत झाली. यामध्ये सावंत विजयी झाले. सावंत विजयी झाल्याचे कळताच माढा येथे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयासमोर तोफांची आतषबाजी करण्यात आली. मंत्री सावंत यांचे मूळगाव असलेल्या वाकाव येथील ग्रामस्थांनी जयवंत बंगला येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या समवेत आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. यावेळी कालिदास सावंत, युवानेते पृथ्वीराज सावंत, सरपंच ऋतुराज सावंत, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मुन्ना साठे, नगरसेवक अरविंद खरात, महातपूरचे माजी सरपंच सम्मेद सावळे, बालाजी बारबोले, निमगावचे सरपंच धर्मराज मुकणे, अजिंक्य काटे, संजय ढेरे यांचेसह वाकाव ग्रामस्थ व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.