शपथविधी सोहळ्याला नागपुरातील चहावाला राहणार उपस्थित:देवेंद्र फडणवीसांनी दिले खास आमंत्रण
23 hours ago
1
महायुती सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांसह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. नागपुरातील एका चहावाल्याला देखील शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गोपाळ बावनकुळे या चहावाल्याला हे खास आमंत्रण दिले आहे. गोपाल बावनकुळे हे नागपूरमधील चहाविक्रेते असून देवेंद्र फडणवीस यांचे मोठे चाहते आहेत. ते रामनगर परिसरात टी स्टॉल चालवतात. त्यांनी आपल्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटो देखील लावला आहे. देवेंद्र फडणवीस हे गोपाल बावनकुळे यांच्या टी स्टॉलवर चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा चहा प्यायला या, असे फडणवीसांना आमंत्रण दिल्याचे गोपाळ बावनकुळे यांनी सांगितले. शपथविधीच्या दिवशी मोफत चहा वाटणार
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत असल्याचा आनंद आहे. 5 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीसाठी मला पक्षाने आणि देवेंद्र फडणवीसांनी पास पाठवला आहे. मी या सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहणार आहे. चहावाला म्हणून मला आमंत्रण दिले आहे. आम्ही त्यांना मेसेज करतो किंवा कोणत्याही माध्यमातून त्यांची भेट घेतो, तेव्हा ते आम्हाला मदत करतात. मी शपथविधी सोहळ्यासाठी जात असलो, तरी त्यादिवशी माझी चहा कँटिन सुरू राहील आणि आम्ही मोफत चहा वाटणार आहोत. असे गोपाल बावनकुळे यांनी म्हणाले. महायुतीच्या नेत्यांकडून शपथविधीच्या तयारीचा आढावा
मुंबईतील आझाद मैदानावरील शपथविधीच्या तयारीचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच शिवसेना आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारांनी आज सकाळी आढावा घेतला. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. महायुती सरकारच्या शपथविधीसाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी, साधू महंत, कलाकार, साहित्यिक यांनाही निमंत्रित केले जाणार आहे. मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय 4 डिसेंबर रोजी जाहीर होईल. महायुती सरकारचा 5 डिसेंबर रोजी शपथविधी ठरला आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री कोण हे ठरले नाही. त्यातच खातेवाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)