अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लामची आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आर्थर रोड तुरुंगात शरीफुल इस्लामची नुकतीच ओळखपरेड झाली.
गेल्या महिन्यात अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हल्ला केल्यानंतर शरीफुल हा तेथून पळून गेला होता. शरीफुलला वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने तो सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. नुकतेच पाच पंच आणि एलियामा, जुणु हे आर्थर रोड तुरुंगात ओळखपरेडसाठी गेले होते. तेथे शरीफुलची ओळखपरेड झाली. त्या ओळखपरेडचा अहवाल हा दोषारोप पत्रात लावला जाणार आहे.