संविधान दिन:‘संविधान मूल्यांची जपणूक करून अखंडता राखावी’

20 hours ago 2
येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान संपतलालजी पेमराजजी सुराणा विधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. अर्चना पवार यांच्याहस्ते भारतीय संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भारतीय संविधानाचे ७५ वर्ष विकास व वाटचाल याविषयी प्राचार्य डॉ. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय राज्यघटनेत अनेक तत्त्वे आहेत. ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे आदी ठरविण्यात आले आहेत. एक व्यक्ती-एक मत आणि एक मत- एक मूल्य हे राजकीय लोकशाहीचे तत्त्व आहे; मात्र आर्थिक आणि सामाजिक पातळीवरील विषमता दूर केल्याशिवाय संपूर्ण लोकशाही स्थापित होऊ शकत नाही. जोवर या देशातील एक व्यक्तीदेखील गुलामीत असेल, अन्न-पाण्यावाचून तळमळत असेल तोवर या स्वातंत्र्याला अर्थ नाही, त्यामुळे आजच्या संविधान दिनापासून जात, धर्म, भाषा, प्रांत, पक्ष या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण सगळे भारतीय समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सहिष्णुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जपणूक करून भारताचे ऐक्य व अखंडता कायम ठेवू, अशी प्रतिज्ञा करूया, तेच भारतीय राज्यघटनेला अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल रेखा खैरनार, अक्षय पाटील, सुरेंद्र बडोदे यांनी केले. यावेळी विधी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article