सोपलांची अस्तित्वाची तर राऊतांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, मतदारसंघात 20 उमेदवार तरी दुरंगी लढत , मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार
1 day ago
2
बार्शीत पारंपरिक कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी दिलीप सोपल व राजेंद्र राऊत यांच्यात दुरंगी लढत होत आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनंजय जगदाळे, मुस्लिम समाजाचे पाच अपक्ष उमेदवारासह एकूण २० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यावेळी दुरंगी लढतीमुळे बार्शीत मत विभागणी होणार नसून एकास एक लढतीत काय होणार याकडे बार्शीकरांचे लक्ष लागून राहिले आहे. यावेळी बार्शीत ७३.१० टक्के एवढे मतदान झाले असून मतदार संख्या वाढूनही टक्का वाढला नाही. मात्र लाडकी बहिण योजनेमुळे बार्शीत महिला मतदान टक्का काही अशी वाढल्याचे दिसते. वैराग भागातील निरंजन भूमकर यांची { राजकीय ताकद यावेळी सोपल यांनी जमेची बाजू ठरू शकते. तसेच माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, कृष्णराज बारबोले हे पिता पुत्र देखील यावेळी सोपल यांच्या बाजूने राहिले त्यामुळे निर्णायक असलेल्या कासबा पेठेतील बारबोले याच्या संपर्काचा सोपल याना किती फायदा होऊ शकतो हे देखील लवकरच कळणार आहे. भाजप कडून राऊत यांना उमेदवारी देण्यात न आल्याने ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश करून शिवसेनेची उमेदवारी घ्यावी लागली. त्यामुळे राऊत हे पहिल्या टप्प्यात प्रचारात पिछाडीवर पडले. याउलट सोपल यांचे नाव ठाकरे गटाच्या पहिल्याच यादीत घोषित करण्यात आले. त्यामुळे प्रचारासाठी सोपलाना उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासूनच प्रचारासाठी अधिकचा वेळ मिळाला. सोपल व राऊत यांनी बार्शी तालुक्यातील आगळगाव येथून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रचाराचा नारळ फुटल्यापासून सोपल गटाने स्थानिक व राज्य केंद्राच्या धोरणावर टीका केली. विशेषतः धाराशिव लोकसभा मतदार संघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यांनी प्रचारात केंद्राच्या योजनावर टीका करत सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यातील महायुतीकडून कसा फटका बसला हे सांगत शेतकऱ्यांची कशी फसवणुक करण्यात येत आहे हे सांगण्यावर भर दिला. लोकसभेला ओमराजे निंबाळकर यांना बार्शी विधानसभा मतदार संघातून मिळालेले विक्रमी मत्तधिक्याचा सोपल याना काय व किती प्रमाणात फायदा मिळतो यावरही निकाल अवलंबून आहे. विकासकामासह भ्रष्टाचारावर घेरले यावेळी बार्शीत प्रचारात प्रामुख्याने कांदा, सोयाबीनचे पडलेले दर, जरांगे फॅक्टर, बार्शीतील दडपशाही व विकासाच्या नावाखाली झालेला भ्रष्टाचार या मुद्द्यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप सोपल गटाने विरोधी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत गटाला चांगलेच धारेवर धरले. तर राऊत यांनी मागील अडीच वर्षात बार्शीत महायुती सरकारच्या माध्यमातून आणलेला ४ हजार कोटी रू. भरघोस निधी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन बार्शी तालुक्यातील सुमारे ८५ हजार महिलांसाठी दिलेला कोट्यवधी रूपयाचा निधी बार्शी शहर नवीन पाणी पुरवठा योजना, बार्शी उपसा सिंचन योजना , एम.आय. डी.सी., बार्शी भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा हे विकास कामांचे मुद्दे लावुन धरत विरोधकांवर पलटवार करत तालुक्यात कोणाची पूर्वी पासून दहशत होती हे सांगण्याचा प्रयत्न केला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)