मोहोळमध्ये पुन्हा घड्याळाची टिकटिक घुमणार की तुतारी वाजण्याची उत्सुकता:कोणाचे नाणे खरे ठरणार , कोण होणार यशवंत
1 day ago
1
मोहोळ विधानसभा मतदारसंघात बुधवारी चुरशीने मतदान झाले. या ठिकाणी १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असलेतरी खरी लढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार यशवंत माने, शरद पवार गटाचे राजू खरे आणि अपक्ष उमेदवार अमोल (रॉकी) बंगाळे यांच्यात खरी लढत होत आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली. शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मोहोळ विधानसभा मतदार संघातील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यशवंत माने यांनी विधानसभा मतदार संघामध्ये साडेतीन हजार कोटी रुपये निधी, मोहोळ शहराची चाळीस वर्षांपूर्वी पासूनची प्रलंबित पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात,पंढरपूर तालुक्यातील १७ गावांचा विकास,उत्तर सोलापूर मधील २५ गावाचा विकास यावर मतदारांना मताचा कौल मागितला. त्याच्या सोबत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार रमेश कदम,भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईक चेअरमन कल्याणराव पाटील, चंद्रभागा कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष सतीश काळेसह महायुतीतील नेत्यांची साथ होती. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांनी कोणत्याही पदावर नसताना शासन स्तरावरून विकास निधी मंजूर,मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये रस्ते, पाणीटंचाईच्या काळामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दीपक गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, शिवसेना नेते संजय देशमुख, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, ऐनवेळी अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांचा पाठींबा खरे यांना मिळाला. तर अपक्ष उमेदवार अमोल बंगाळे उत्तर सोलापूर गावांच्या सोडवलेल्या अडीअडचणी केलेल्या विकास कामावर मीच निवडून येणार असा दावा केला आहे. यशवंत मानेसह राजन पाटील यांच्या विरोधामध्ये विरोधकांनी टक्केवारी आमदार, अनगर अप्पर तहसील, विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही.अगदी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्वांनीच खालच्या थरावर जाऊन टीकेची झुंबड उडवली होती. खालच्या थरावर जाऊन केलेली टीकाच सुज्ञ मतदाराला खटकली. याशिवाय,अप्पर तहसील कार्यालयास काही गावांचा विरोध तसेच मनोज जरांगे पाटील यांनी कोणताही आदेश न दिल्याने सकल मराठा बांधवांमध्ये शांतता पहावयास मिळाली. विकासाच्या मुद्द्यासह वैयक्तिक टीकाही महाविकास आघाडीतील उमेदवारासह नेत्यांनी जोरदार टीका केली. तर महायुतीतील स्थानिक नेत्यांनी विरोधकांवर टीका टाळली. मतदारसंघात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. राष्टवादीच्या फुटीनंतर प्रथम विधानसभेची निवडणूक होत आहे. तुतारी आणि घड्यात यांच्यातच टक्कर पाहयला मिळाला.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)