महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोल्सनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. पोल्सनुसार, त्यांच्या पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना मात्र जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. ४० जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झाल्याने या निवडणुकीत अनेकांचे राजकीय भविष्य निर्धारित होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोणाकडे जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे. मतदानानंतर विविध संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी देखील समोर आली आहे. या आकडेवारीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. कारण दोन्ही नेत्यांच्या पक्षांना सध्या पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. याउलट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाचे उमेदवार वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या अडीच वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथनंतर आता जनतेच्या कोर्टात खरी राष्ट्रवादी आणि खरी शिवसेना कुणाची? याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पार पडलेल्या मतदानात अनेक नेत्यांचे भवितव्य मतदानपेटीत कैद झालं आहे. राज्यात 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झालाय. पश्चिम महाराष्ट्र जो नेहमी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय तो यंदा अजितदादांना कौल देणार की शरद पवारांना याकडेही महाराष्ट्राच्या नजरा आहेत. शिवसेने प्रमाणे दोन्ही राष्ट्रवादींमध्येही 40 जागांवर सामना आहे. त्यामुळे पवार काका-पुतण्यांच्या लढाईत कोण कुणावर वरचढ ठरेल याचा फैसला या ४० जागांवरचे निकाल ठरवतील.
राष्ट्रवादी ‘या’ 40 जागांवर समोरासमोर
- अणुशक्ती नगर मध्ये सना मलिक विरुद्ध फहाद अहमद
- श्रीवर्धन आदिती तटकरे विरुद्ध अनिल नवगणे
- जुन्नरमध्ये अतुल बेनकेंविरोधात सत्यशील शेरकर
- आंबेगावात दिलीप वळसे पाटलांविरोधात देवदत्त निकम
- शिरूरमध्ये ज्ञानेश्वर कटके विरुद्ध अशोक पवार
- इंदापुरात दत्तात्रय भरणेंविरोधात हर्षवर्धन पाटील
- बारामती- अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार
- पिंपरी- अण्णा बनसोडे विरुद्ध सुलक्षणा शिलवंत
- वडगाव शेरी- सुनील टिंगरेंविरोधात बापूसाहेब पठारे
- हडपसर- चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप
- अकोलेत किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे
- कोपरगावात आशुतोष काळेंविरोधात संदीप वर्पे
- पारनेरमध्ये राणी लंकेंविरोधात काशीनाथ दाते
- नगरमध्ये संग्राम जगतापांविरोधात अभिषेक कळमकर
- माजलगावात प्रकाश सोळंकेंविरोधात मोहन जगताप
- बीड विधानसभेत संदीप क्षीरसागर विरुद्ध योगेश क्षीरसागर
- आष्टीत मेहबूब शेख विरुद्ध बाळासाहेब आजबे
- परळीत धनंजय मुंडेंविरोधात राजेसाहेब देशमुख
- अहमदपुरात बाबासाहेब पाटलांविरोधात विनायक जाधव
- उदगीरमध्ये संजय बनसोडेंविरोधात सुधाकर भालेराव
- माढामध्ये अभिजीत- पाटील विरुद्ध मीनल साठे
- मोहोळमध्ये यशवंत मानेंविरोधात राजू खरे
- फलटण विधानसभेत दीपक चव्हाण विरुद्ध सचिन कांबळे
- वाईमध्ये मकरंद पाटलांविरोधात अरुणा पिसाळ
- चिपळूण- शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव
- चंदगड- राजेश पाटील विरुद्ध नंदिता बाभूळकर
- कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे
- इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील
- तासगावात रोहित पाटील विरुद्ध संजय पाटील
- सिंदखेडराजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर
- मोर्शीत देवेंद्र भुयार विरुद्ध गिरीश कराळे
- तुमसर- राजू कारेमोरे विरुद्ध चरण वाघमारे
- अहेरीमध्ये धर्मरावबाबा आत्राम विरुद्ध भाग्यश्री आत्राम
- पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध शरद मैंद
- वसमत विधानसभेत राजू नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर
- येवल्यात छगन भुजबळांविरोधात माणिकराव शिंदे
- सिन्नर- माणिकराव कोकाटे विरुद्ध उदय सांगळे
- दिंडोरी- नरहरी झिरवळ विरुद्द सुनीता चारोसकर
- शहापुरात दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग बरोरा
- मुंब्रा कळव्यात जितेंद्र आव्हाड विरुद्एध नजीब मुल्ला